Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वसंतदादा घराणे भाजपमध्ये : जयश्री पाटील यांचा प्रवेश निश्चित : पालकमंत्री चंद्रकांतदादांचा काँग्रेससह अजित पवारांना धक्का

वसंतदादा घराणे भाजपमध्ये : जयश्री पाटील यांचा प्रवेश निश्चित : 
पालकमंत्री चंद्रकांतदादांचा काँग्रेससह अजित पवारांना धक्का

सांगली : खरा पंचनामा

पक्ष विरोधी कृत्य केल्याप्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या जयश्री पाटील यांनी भाजपची ऑफर स्वीकारली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्या आज भेट घेत पुढील निर्णय घेणार आहेत. दरम्यान जयश्री पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा चर्चा सुरू होत्या.

पण, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. यानंतर आता दोन दिवसात, त्या भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा, श्रीमती जयश्रीताई पाटील काँग्रेसमध्ये नाराज होत्या. त्यानंतर त्यांच्या गटाच्या झालेल्या बैठकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची चाचपणी करण्यात आली होती. त्यास पदाधिकाऱ्यांनीही संमती दिली होती. यानंतर जयश्री पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चांना वेग आला होता.

तर त्या आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर होणाऱ्या अजित पवार यांच्या जिल्हा दौऱ्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील असेही म्हटलं जात होते. पण आमदार सुरेश खाडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्यांना भाजपची ऑफर देत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये जयश्रीताईंना मोठा मान असल्याचे म्हटलं होते. तसेच त्यांच्याच काँग्रेसमध्ये त्यांचा मानसन्मान नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडीही उपस्थित असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.

आता जयश्रीताईंचा निर्णय झाला असून त्या राष्ट्रवादीत नाहीत तर भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशावर पक्षाच्या शिर्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे आता आगामी पालिका निवडणुकांमुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिका राजकारणात तीन दशके हुकूमत गाजविलेल्या माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर श्रीमती पाटील यांनी नेतृत्व सांभाळत पालिकेत काँग्रेस झेंड्याखाली गट सांभाळला होता.

त्याच्याच बळावर त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण ही मागणी काँग्रेसने नाकारली. यामुळेच त्यांनी विधानसभेला बंड केले होते. त्यांना विधानसभेला 33 हजार मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभूत झाला होता. ज्याची चर्चा जिल्ह्यासह राज्यभर झाली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.