शस्त्र तस्करांसह गुन्हेगारांचे कंबरडे मोडा
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचना
सांगली : खरा पंचनामा
वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे, यासाठी वाहतूक शाखा, आरटीओ विभागाने सक्रीय राहणे गरजेचे आहे, बेकायदा शस्त्र तस्करांसह गुन्हेगारांचे कंबरडे मोडा, अशा सूचना कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आज सोमवारी येथे दिल्या.
महानिरीक्षक फुलारी सांगली दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेतला. यावेळी अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, उपाधीक्षक उपस्थित होते. आगमी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. सण उत्सव शांततेत होण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठकी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गुन्ह्यांचा आढावा घेतना ते म्हणाले, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपींना तत्काळ अटक करून वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे. तसेच क्लिष्ट गुन्ह्यमध्ये न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि अधुनिक साधुनसामुग्रीचा योग्य वापर झाला पाहिजे.
महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी गांभिर्याने दखल घेतली पाहिजे. कायदे बदललेत आणि संगणक प्रणालीही वापरात आली आहे. त्याचे प्रत्येकाला प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. अवैध अग्नीशस्त्राबाबत फुलारी यांनी गांभिर्याने दखल घेतली. ते म्हणाले, बेकायदा अग्नीशस्त्राबाबत सांगली पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पण यातील तस्करांच्या मुसक्या आवळ्याची गरज आहे. याची पाळेमुळे खणून काढली पाहिजे. गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी प्रभावी गस्तीसह विशेष मोहिम हाती घेतली पाहिजे.
पोलिस मुख्यालयात वृक्षारोपण
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनासाठी पोलिस दलाची विशेष मोहिम सुरू आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येत आहे. आज सांगली पोलिस मुख्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.