Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर युद्ध थांबले, इराणने शस्त्रसंधीबाबतचा गोंधळ संपवला

अखेर युद्ध थांबले, इराणने शस्त्रसंधीबाबतचा गोंधळ संपवला

दिल्ली : खरा पंचनामा

इस्त्रायल आणि इराण दरम्यान गेल्या 12 दिवसांपासून सुरु असलेले युद्ध थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि इराण दरम्यान शस्त्रसंधी झाल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडून काढत शस्त्रसंधी झाली नसल्याचे म्हटले होते. परंतु अखेर इराणने शस्त्रसंधी झाल्याचा निर्णय जाहीर केला. इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलने इस्त्रायलसोबतचे युद्ध थांबल्याचे जाहीर केले. दुसरीकडे इस्त्रायलकडून इराणी हल्लासंदर्भात अलर्ट मागे घेण्यात आला आहे. नागरिकांना बंकरमधून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शविली होती. परंतु युद्धबंदी लागू झाल्यानंतरही इराणकडून इस्रायलवर बॉम्बहल्ला करण्यात आला. त्यामुळे संशयाची परिस्थिती निर्माण झाली होती. इस्रायली संरक्षण दलाने म्हटले होते की, इराणने एका तासात तीन वेळा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत आणि त्यात चार नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये हल्ल्यामुळे तेल अवीवमध्ये सायरन वाजवण्यात आले आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले होते की, आमचे शक्तीशाली लष्कर शेवटच्या क्षणापर्यंत इस्त्रायलला धडा शिकवणार आहे. मी आमच्या सशस्त्र दलाचे कौतूक करतो. त्यांनी पराक्रमांची पराकाष्टा करत आपल्या देशाची सेवा केली. आपले सैन्य दल रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाच्या संरक्षणासाठी तयार असते.

इस्त्रायल आणि इराण दरम्यान 13 जूनपासून युद्ध सुरु झाले आहे. या युद्धात इराणचे तीन प्रमुख अणू प्रकल्प फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर अमेरिकेने बंकर बस्टरने हल्ले केले. इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामीसह इतर सैन्य कमांडर्स आणि अणूशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. तसेच इराणमधील जवळपास एक हजार जणांचा मृत्यू झाला. इराणमधील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले. या युद्धात इराणला कोणाचीही सोबत मिळाली नाही. चीन-रशियासारख्या देशांनी नैतिक पाठिंबा दिला. परंतु उघडपणे या दोन्ही देशांनी इराणला पाठिंबा दिला नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.