Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परिवहन मंत्र्यांकडून परिवहन विभागाची श्वेतपत्रिका सादर

परिवहन मंत्र्यांकडून परिवहन विभागाची श्वेतपत्रिका सादर

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक स्थितीचा पारदर्शक आढावा देताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात परिवहन विभागाची श्वेतपत्रिका सादर केली.

2001 पासून आतापर्यंत राज्य सरकारने एसटी महामंडळाला तब्बल 6353 कोटी रुपयांची भांडवली मदत दिली असून, केवळ 2020 ते 2023 या कालावधीत 4708 कोटींची महसुली मदत करण्यात आली आहे. तरीदेखील एसटीवर 3297 कोटी रुपयांची वैधानिक स्वरूपाची देणी प्रलंबित आहेत, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

परिवहन मंत्र्यांनी श्वेतपत्रिकेत एसटीच्या तोट्याची प्रमुख कारणे उघडकीस आणली. त्यामध्ये
बसचा अपुरा ताफा
तोट्यात चालणाऱ्या फेऱ्या
वेळेवर भाडेवाढ न होणे
खासगी वाहतुकीचा वाढता दबाव
हे घटक विशेष महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची सेवा सक्षम करण्यासाठी एसटी महामंडळाने दरवर्षी ५ हजार नव्या बसेस ताफ्यात आणण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी जाहीर केले. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारकडून धोरणात्मक पाठबळ आणि आर्थिक सहकार्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"एसटी ही केवळ वाहतुकीची संस्था नाही, तर राज्यातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची श्वासवाहिनी आहे. त्यामुळे ती आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी पारदर्शकता, कामकाजात सुधारणा आणि धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत," असे सांगून मंत्री सरनाईक यांनी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. राज्यातील कोट्यवधी प्रवाशांना स्वस्त, सुरक्षित व वेळेवर सेवा मिळावी, हा या श्वेतपत्रिकेचा मुख्य उद्देश आहे. तसेच नागरिकांच्या पैशाचा हिशेब जनतेपुढे मांडण्याची ही प्रक्रिया लोकशाहीतील जबाबदारी म्हणून त्यांनी अधोरेखित केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.