सामाजिक कार्यकर्ता आणि पोलिसांचा जुगार अड्डा लेडी सिंघम गीता बागवडे यांनी केला उध्वस्त!
पहा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
औरंगपुरा भाजीमंडईतील एका इमारतीत सामाजिक क्रीडा मंडळ, सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकून २४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या क्लबमधून जवळपास एक लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सामाजिक कार्यकर्ता आणि पोलिसांनी मिळून हा क्लब सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
औरंगपुरा परिसरात रणजितसिंग चव्हाण हा क्लब चालवत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. मंगळवारी दुपारी चार वाजता बागवडे यांनी पथकासह क्लबवर छापा मारला. तेव्हा तेथे पाच टेबलवर जुगाऱ्यांचा डाव रंगलेला होता. जुगाऱ्यांसाठी कूलर, पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यात आली होती. यात प्रामुख्याने विविध विषयांवर आंदोलन करणारे, नेत्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणारा रमेश पाटील, पोलिस कर्मचारी सुरेश इंगळे, कान्होबा भोने, शुभम पंढुरे, मोईन अहमद अजीज अहमद, किरण भाटी, उदय भाटी, अक्षय चावरीया यांच्यासह २३ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
घटनास्थळी रोख रक्कम केवळ १७ हजार रुपयेच मिळून आली. मात्र, ७ क्युआर कोड आढळले. सातही क्युआर कोड विविध व्यक्तींच्या नावे आहेत. त्यावरच ऑनलाइन पैसे घेऊन कॉईनवर जुगार खेळवला जात होता. यात पकडला गेलेला शेख हबीब शेख रहमान (वय ५५, रा. कटकट गेट) हा चव्हाण, पाटील व इंगळे यांच्या सांगण्यावरून २०० रुपये रोजाने साफसफाईचे काम करीत होता, अशी कबुली त्याने दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.