Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाडमधील विवाहिता आत्महत्या प्रकरणातील कोणत्याही संशयिताने आत्महत्या केली नाही अफवा पसरवल्यास कडक कायदेशीर कारवाई करू : उपाधीक्षक गिलडा

कुपवाडमधील विवाहिता आत्महत्या प्रकरणातील कोणत्याही संशयिताने आत्महत्या केली नाही 
अफवा पसरवल्यास कडक कायदेशीर कारवाई करू : उपाधीक्षक गिलडा 

सांगली : खरा पंचनामा 

कुपवाड येथील विवाहितेने धर्मांतराच्या कारणावरून केलेल्या आत्महत्या प्रकरणातील कोणत्याही संशयिताने कारागृहात आत्महत्या केलेली नाही. यासंदर्भात कोणीही सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमाद्वारे अफवा पसरवल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करू असा इशारा पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिलडा यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी कुपवाड येथील एका विवाहितेने आत्महत्या केली होती. धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याने तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे संशयित सांगलीतील कारागृहात आहेत. यातील एका संशयिताने कारागृहात आत्महत्या केल्याची अफवा कोणीतरी खोडसाळपणे पसरवत आहे. विविध माध्यमाद्वारे काही समाजकंटक असे कृत्य करत आहेत. प्रत्यक्षात मात्र यातील कोणत्याही संशयिताने कारागृहात आत्महत्या केली नसल्याचे कारागृह प्रशासनाने पोलिसांना सांगितले आहे.

सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी काही समाजकंटक संशयिताने आत्महत्या केल्याची अफवा पसरवत आहेत. अशांवर तसेच सोशल मीडियावर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपाधीक्षक गिलडा यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.