Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई बॉम्बस्फोटतील मुख्य आरोपी साकीब नाचनचा जेलमध्ये मृत्यू

मुंबई बॉम्बस्फोटतील मुख्य आरोपी साकीब नाचनचा जेलमध्ये मृत्यू

मुंबई : खरा पंचनामा

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी ईसीस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या साकीब नाचन याचा जेलमध्ये मृत्यू झाला आहे. रात्री ब्रेन हॅमरेज झाले म्हणून साकीब नाचन याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्याला दिल्लीच्या दीनदयाळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साकीबच्या मृत्यूनंतर ठाणे रुरल पोलिसांचा मोठा बंदोबस्त पडघा गावाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे.

साकिब नाचन याला 1990 च्या दशकातल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी 'टाडा' न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली. पुन्हा 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी साकिबला अटक झाली. त्यावेळी तो ठाणे कारागृहात होता. नाचण याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याची पाच महिने 13 दिवस आधीच सुटका केली होती. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातील पडघा येथे दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणाच्या संदर्भात छापे टाकले होते. यावेळी नाचन याला अटक करण्यात आली होती.

साकिब नाचनवर दहशतवादी संघटना ISIS आणि SIMI शी संबंध असल्याचा आरोप आहे. साकिब नाचन यांना 2002 आणि 2003 मध्ये मुंबईतील घाटकोपर, विले पार्ले आणि मुलुंड रेल्वे स्थानकांवरील बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरविण्यात आले होते. याप्रकरणी त्याला POTA अंतर्गत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 2017 मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याची सुटका झाली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.