Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हनिमुनसाठी गेली अन् नवऱ्याला संपवलं!

हनिमुनसाठी गेली अन् नवऱ्याला संपवलं!

शिलॉंग : खरा पंचनामा

सोशल मिडियावर सध्या 'सोनम बेवफा है' असा ट्रेंड सुरू आहे. ही सोनम नेमकी कोण? तिच्याबद्दल एवढी चर्चा का सुरू आहे. लग्न झालं... नवीन जोडपं हनिमुनसाठी मेघालय गेलं. अन् त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. नंतर काही दिवसांनी नवऱ्या मुलाचा मृतदेह सापडला, तर नवरी मुलगी गायब होती... हीच ती सोनम. जिने मेघालय पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय.

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम नावाच्या तरूणीचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. ते 20 मे रोजी हनिमुनसाठी गेले. शिलाँगजवळील मावलाखियात गावात होमस्टे करून राहिले. 23 रोजी सकाळी त्यांनी चेकआऊटकेलं. पण 24 मे रोजी सोहरीम जवळ त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली. पण 2 मे रोजी जे घडलं, ते अत्यंत भयानक होतं. वायसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला. हातावरील टॅटूने त्याची ओळख पटली.

मेघालय पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. परंतु सोनम अजूनही बेपत्ताच होती. राजाचं कुटूंब सीबीआय चौकशीची मागणी करत होतं. स्कूटी जिथे सापडली होती, त्याच्यापासून 25 किलोमीटर अंतरावर राजाचा मृतदेह आढळला. राजाचं अपहरण करून हत्या करण्यात आली. सोनमचंही अपहरण झालं असावं, अशी शंका व्यक्त केली जात होती.

राजाची सोन्याची साखळी, हिऱ्याची अंगठी, ब्रेसलेट आणि पाकिट गायब होतं. त्यामुळे चोरीसाठी त्याची हत्या करण्यात आल्याचं संशय सगळीकडून व्यक्त केला जात होता. इंदौरमध्ये राजावर अंत्यसंस्कार पार पडले. सोनमला शोधण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ यांच्या मदतीने शोध मोहिम सुरू आहे. तर राजाचा मोबाईल अन् हत्येत वापरलेलं शस्त्र पोलिसांनी जप्त केला होता. पण या बहुचर्चित प्रकरणात जे सत्य बाहेर आले, त्याने सर्वांनाच धक्का बसलाय. सोनम रघुवंशीला गाझीपूर येथून अटक करण्यात आलीय. तिच्यासोबत आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, पत्नी सोनम रघुवंशी यांनी पती राजा रघुवंशी यांना मारण्यासाठी मारेकऱ्यांना कामावर ठेवले होते. हनिमुनच्या वेळीच तिने हे कारस्थान रचले होते. असं काही विपरीत घडेल, याचा विचार सुद्धा राजाच्या कुटुंबाने केला नव्हता. मेघालयचे सीएम संगमा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, राजा हत्याकांडात 7 दिवसांत मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक केली आहे. संबंधित महिलेने आत्मसमर्पण केलंय.

आहेत. सोनमने नवऱ्याला रस्त्यातून का हटवले? तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम होते का? राजा रघुवंशी यांची हत्या कोणत्या कारणामुळे केली? पोलीस या सगळ्या प्रश्नांचा शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.