अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती करा, अन्यथा धुलाई भत्ता बंद करा
सत्यमेव जयते संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रभात हेटकाळे यांचे आयुक्ताना निवेदन
सांगली : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा गणवेश परिधान करत नसल्याचे दिसून आले आहे. गणवेश परिधान न करता त्याचा धुलाई भत्ता मात्र ते नियमित घेत आहेत. अवैध व्यवसायिकांवर धाक बसवण्यासाठी तसेच त्यांना जरब बसावी यासाठी या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना गणवेश परिधान करणे बंधनकारक करावे तसेच जे तो परिधान करणार नाहीत त्यांचा धुलाई भत्ता बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सत्यमेव जयते संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रभात हेटकाळे यांनी राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
मुंबई येथील उत्पादन शुल्कच्या कार्यालयात डॉ. देशमुख यांची भेट घेऊन हेटकाळे यांनी हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ज्या अधिकारी, कर्मचारी यांना गणवेश विहित केला आहे, त्या पदावरील व्यक्तीने कर्तव्यावर असताना गणवेशाचा वापर करणे हा त्यांच्या कर्तव्याचा व जबाबदारीचा अविभाज्य भाग आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क हा विभाग शासनाच्या महसुलाशी निगडीत आहे. शासनाने विहित केलेला गणवेश परिधान करणे अधिकारी व कर्मचार्याच्या दृष्टीकोनातून अभिमानाची बाब आहे. कर्तव्य करत असताना अधिकाऱ्यांनी गणवेश वापरला पाहिजे असा नियम असताना त्याकडे जाणूनबुजून सांगली जिल्ह्याचे अधिकारी, जवान व जवान नि वाहन चालक हे एक दिवस सुद्धा कार्यालयामध्ये गणवेश घालत नाही असे निदर्शनास आले आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपला गणवेश स्वच्छ व नीटनेटका ठेवणे तसेच विहित केल्याप्रमाणे परिधान करणे ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. तसेच विभागामध्ये शिस्तप्रिय वातावरण राहावे या करिता गणवेश परिधान करणे या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पगारातून गणवेश धुलाई भत्ता शासनाकडून दिला जातो तरी सुद्धा विभागामधील अधिकारी व कर्मचारी गणवेश घालून शासकीय काम करीत असताना त्यांना गणवेश घालून भ्रष्टाचार करता येणार नाही म्हणून गणवेश घालण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. सध्याची सांगली जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क, विभागाची वस्तुस्थिती पाहता शासकीय कार्यालयामध्ये शासकीय व्यक्ती कोण व बाहेरील खाजगी व्यक्ती कोण हे ओळखणे सामान्य जनतेला अवघड झाले आहे. गणवेश न घातल्याने अवैध्य मद्यविक्री करणाऱ्यावर विभागाची भीती नाहीशी झाले असल्याचे दिसून येते.
शासन परिपत्रकानुसार विभागातील जवान ते उपआयुक्त दर्जाच्या अधिकार्यांनी गणवेषात राहणे अनिवार्य असल्याने सप्ताहातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सक्तीने गणवेश परिधान करून कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. जर नेमून दिलेल्या या तीन दिवसात सार्वजनिक सुट्टी असल्यास त्याच्या पुढच्या दिवशी गणवेश परिधान करावा असे नमूद केले आहे. तरी मी आपणास विनती करतो कि आपले कार्यालयाकडील दि. 07/05/2016 चे परिपत्रक रद्ध करून शासकीय कामकाजाचे आठवड्यातील पूर्ण दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय गणवेश सक्तीने परिधान करणेबाबतचे नवीन परीपत्रक जारी करण्यात यावे व होणारा भ्रष्टाचारास आळा घालून महसूल वाढविण्याच्या दृष्टीने गणवेश परिधान करून शासकीय कामाची अंमलबजावणी करणेबाबत संबंधीत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सूचना करणेत यावे. महाराष्ट्र शासनाने दिलेला गणवेश कोणी अधिकारी व कर्मबारी यांनी परिधान न करता कार्यालयामध्ये कामावर आलेस त्यांच्यावर बडतर्फेची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही हेटकाळे यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.