Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पोलीस व्हॅनचा अपघातजखमींवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पोलीस व्हॅनचा अपघात
जखमींवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू

पनवेल : खरा पंचनामा

नवी मुंबईत मागील अनेक दिवसांपासून अवैध वास्तव्य करणा-या बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलिसांनी करुन त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याची जोरदार कारवाई सुरू केली आहे.

याच कारवाईचा एक भाग म्हणून या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबईतून पुणे येथे पोलीस व्हॅनमधून नेत असताना बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावरील पनवेलजवळील भाताण बोगद्यामध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये पोलीस कर्मचारी व काही बांगलादेशी नागरिक जखमी झाले. २७ जखमींना तातडीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात सकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती बरी असल्याचे सांगीतले जात आहे. जखमींमध्ये १५ पोलीस व १२ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. एका पोलीसाची प्रकृती गंभीर आहे.

गृह विभागाच्या सूचनेनंतर मुंबई महानगर क्षेत्रातील विविध पोलीस आयुक्तालयात अवैध वास्तव्य करणा-या बांगलादेशी नागरिकांची धरपकड एकाच दिवशी म्हणजे ७ जूनपासून ते पुढील ५ दिवस १२ जूनपर्यंत करण्यात आली. एकाच वेळी कारवाई झाल्यास या बांगलादेशींना पळण्यासाठी वाव मिळू नये असा या मोहीमेमागील उद्देश होता. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईला सर्वाधिक यश मिळाले. अवघ्या तीन दिवसात १२२ पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक नवी मुंबईत अटक करण्यात आले.

नवी मुंबईतील २० पोलीस ठाण्यातील सर्वच पोलिसांनी या कारवाईमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक पकडले गेले. नवी मुंबई पोलिसांची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईनंतर या बांगलादेशींना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची कायदेशीर प्रक्रिया किचकट असल्याने ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी या नागरिकांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना सूखरुप सीमेवरील सूरक्षा यंत्रणेच्या हाती सोपविण्यासाठी यावेळेस पोलीस आयुक्त भारंबे यांनी पुढाकार घेऊन पुणे येथील विमान प्रवासाने त्यांना सिमेवर पाठविण्याचे नियोजन केले होते. पहिल्यांदा विमानातून हस्तांतरण होण्याच्या या प्रक्रियेलाच गालबोट लागले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातामध्ये मुंबई पोलीस दलातील ३ पोलीस उपनिरिक्षक, ११ पोलीस अंमलदार जखमी आहेत. यातील एका पोलीस कर्मचा-याची प्रकृती गंभीर आहे. नवी मुंबई पोलीस दलातील ४ पोलीस अंमलदार सुद्धा किरकोळ जखमी आहेत. यामध्ये एका महिला पोलीस कर्मचारीच्या तोंडाला व दाताला दुखापत झाली आहे. एका सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाचे हाताचे हाड तुटले आहे. एका पोलिस कर्मचारीचे छातीला दुखापत झाली असून व्हॅनचालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. या अपघातामध्ये १२ बांगलादेशी नागरिक जखमी आहेत. यामध्ये ९ महिला, दोन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.