Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ७५ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा

राज्यातील ७५ पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा बडगा

सांगली : खरा पंचनामा

सहायक पोलिस आयुक्तपदावर पदोन्नतीच्या यादीत समावेश असलेल्या राज्यातील ७५ वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारली. त्यामुळे त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. या संदर्भात पोलिस महासंचालक कार्यालयातून आदेश निघाला असून, अधिकाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई केली, याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाने २०२२ ते २०२४ या वर्षांत पोलिस निरीक्षक ते सहायक आयुक्त (एसीपी) पदोन्नतीच्या दोन याद्या जाहीर केल्या. त्यात जवळपास पाचशेवर पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली, तर २०२५ मध्ये २१५ पोलिस निरीक्षकांचा पदोन्नतीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, सहायक पोलिस आयुक्त किंवा पोलिस उपअधीक्षक पदावर पदोन्नती घेण्यासाठी राज्यातील अनेक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी अनुत्सुक असल्याचे आणि पोलिस महासंचालक कार्यालयाच्या लक्षात आले.

सेवानिवृत्तीसाठी बराच कालावधी बाकी असल्यामुळे काही पोलिस अधिकारी पदोन्नतीसाठी इच्छुक नसल्याने पदोन्नती नाकारतात. त्यासाठी पोलिस अधिकारी स्वतःच्या सेवाकाळात झालेली विभागीय चौकशी, कसुरी अहवाल तसेच एखाद्या प्रकरणात आलेल्या नोटीसचा आधार घेऊन पोलिस महासंचालक कार्यालयाला माहिती पाठवून एकप्रकारे एसीपीचे प्रमोशन नाकारतात. तसेच ठाणेदारपद 'क्रीम पोस्टिंग' अनेक अधिकारी एसीपी पदावर पदोन्नती नाकारतात. राज्यातील ७५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी पदोन्नती नाकारल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी कारवाई केल्याचा अहवाल मागविण्यात आल्यामुळे, कारवाई होणार नाही, अशा आविर्भावात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सर्वाधिक मुंबईच्या अधिकाऱ्यांनी नाकारली पदोन्नती आतापर्यंत गृहमंत्रालयाने काढलेल्या पदोन्नतीच्या यादीतील ७५ निरीक्षकांनी एसीपी पदावर पदोन्नती घेण्यास नकार दिला होता. त्यात सर्वाधिक २४ अधिकारी मुंबई पोलिस दलातील होते. त्यापाठोपाठ ठाणे आणि पुण्यातील ९, तर एसीबीचे चार, पिंपरी-चिंचवडचे चार यासह अन्य जिल्ह्यांतील पोलिस निरीक्षकांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.