'बाप' काढणाऱ्या नितेश राणेंना बापानेच फटकारले
धाराशिव : खरा पंचनामा
महायुतीमध्ये कोणीही कितीही उड्या मारल्यातरी येथे भाजपचा मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांचा बाप बसला आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते.
तर यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री राणे यांची चांगलीच कानउघडणी केली होती. यानंतर आता नितेश राणे यांना त्यांचे वडील आणि माजी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समज दिली असून त्यांनी देखील समज दिली आहे. नारायण राणे यांनी, 'मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिलीय', असे म्हटलं आहे. ते बुधवारी (ता. 11) धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
नितेश राणेंच्या बाप या वादग्रस्त वक्तव्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष घालावे लागले. त्यांनी, 'तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, अशा शब्दात नितेश राणेंना खडसावलं होतं ! तसेच राजकारणात पर्सेप्शन महत्त्वाचे असते, असेही खडेबोल सुनावले होते. यानंतर आता नारायण राणे यांनी आपल्या सुपुत्राचे कान धरले आहेत.
नारायण राणे यांनी, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. तो जनतेचा सेवक असतो. मी देखील मुख्यमंत्री होतो. त्यावेळी कायम सांगायचो की, मला साहेब म्हणू नका. सेवक म्हणा. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे. त्याबद्दल आपण सूचना देणार असल्याचेही म्हटलं आहे.
दरम्यान नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यावर टीकेची झोड उडवली. महाजन यांनी काल केलेल्या आव्हानानंतर राणे यांनी, महाजन हा मेंटल असून माझी तुलना त्याच्याशी का करता? मी दिल्लीला होतो. आता तेथून मी याला भेटायला क्रांती चौकात जायचं का? असा टोला देखील लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.