Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता वाहन धारकांना मिळणार वार्षिक पास?

आता वाहन धारकांना मिळणार वार्षिक पास?

दिल्ली : खरा पंचनामा 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी टोल कर नियमांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली.

त्यांनी यावेळी, "आता ३००० रुपयांना फास्टॅग पास मिळेल ज्यामुळे तुमचा प्रवास मोफत होईल, परंतु तो एका निश्चित कालावधीसाठी असेल" असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, "एका ऐतिहासिक उपक्रमात, १५ ऑगस्ट २०२५ पासून ३,००० रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० प्रवासांसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. हा पास विशेषतः गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यास सक्षम करेल" असे म्हटले आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, "वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी/नूतनीकरण करण्यासाठी हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MORTH वेबसाइटवर लवकरच एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी आणि त्रासमुक्त होईल. हे धोरण ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता दूर करेल आणि एकाच सोयीस्कर व्यवहाराद्वारे टोल पेमेंट अखंड करेल" अशी माहिती दिली.

गडकरी यांनी पोस्टमध्ये, "फास्टॅग पासमुळे प्रतीक्षा वेळ कमी होईल. ते म्हणाले, "प्रतीक्षा वेळ कमी करून, गर्दी कमी करून आणि टोल प्लाझावरील वाद दूर करून, वार्षिक पास धोरण लाखो खाजगी वाहनचालकांना जलद, सुरळीत आणि चांगला प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे." असेही म्हटले आहे.

हा पास विशेषतः केवळ गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन करण्यात आला आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना हे लागू असेल. यामध्ये व्यावसायिक वाहनांचा समावेश नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.