Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस रात्री आरोपीच्या घराचा दरवाजा ठोठावू शकत नाहीहायकोर्टाचा निर्वाळा

पोलीस रात्री आरोपीच्या घराचा दरवाजा ठोठावू शकत नाही
हायकोर्टाचा निर्वाळा

थिरुवनंतपुरम : खरा पंचनामा

रात्री-अपरात्री आरोपीच्या घरावर धडकणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. पोलिस रात्रीच्या वेळी पाळत ठेवण्याच्या बहाण्याने संशयित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीच्या घरात प्रवेश करू शकत नाहीत किंवा दरवाजे ठोठावू शकत नाहीत, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

रात्री उशिरा पोलिसांनी एका आरोपीच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरोपीने पोलिसांना धमकावल्याचा आरोप होता. संबंधित आरोपीविरोधातील एफआयआर रद्द करताना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. जी. अरुण यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

घर ही संकल्पना निवासस्थानाच्या भौतिक स्वरुपाच्या पलीकडे आहे हे पोलिसांनी समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे घर हे एकतर त्याच्यासाठी मंदिर किंवा किल्ला असते. त्यामुळे कुणा व्यक्तीच्या घराचा दरवाजा ठोठावून त्या घराचे पावित्र्य कलंकित केले जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या अधिकारात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.

सन्मानाने जगण्याच्या अधिकाराशी तडजोड करु शकत नाही, असे खडे बोल न्यायालयाने निर्णय देताना पोलिसांना सुनावले. केरळ पोलिसांची नियमावली देखील अत्यंत स्पष्ट आहे. ती नियमावली देखील पोलिसांना आरोपी वा संशयित गुन्हेगारी व्यक्तीच्या घराचा दरवाजा रात्रीच्या सुमारास ठोठावण्यास मुभा देत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.