संतोष देशमुख यांचा मुलगा विराज शिराळ्याच्या सैनिकी शाळेत शिकणार
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला
मुंबई : खरा पंचनामा
मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाची पूर्तता करत, विराज देशमुख याला सांगली जिल्ह्यातील रेठे धरण येथील सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री निवास 'वर्षा' येथे झालेल्या एका कार्यक्रमात, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आले. विशेष म्हणजे, विराज देशमुख याच्यासह त्याचा चुलत भाऊ सत्यजित देशमुख यानेही याच सैनिकी शाळेत प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.