Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नवी मुंबई विमानतळ इमिग्रेशनसाठी 285 पोलिसपदे

नवी मुंबई विमानतळ इमिग्रेशनसाठी 285 पोलिसपदे

मुंबई : खरा पंचनामा

बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता असून, राज्य सरकारकडून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. गृह विभागाने विमानतळ इमिग्रेशन चेकपोस्टसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर पोलीस शिपायांपासून ते पोलीस निरीक्षकापर्यंत एकूण 285 पदे नव्याने निर्माण करण्यास आणि त्यासाठी 10 कोटी 10 लाख रुपयांच्या खर्चालाही गृहविभागाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत येत्या 17 सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेशच्या विकासाला गती देणाऱ्या आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 18 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.

संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये 4 प्रवासी टर्मिनल, 2 रनवे, 1 कार्गो ट्रक टर्मिनल व इतर महत्त्वाच्या संरक्षण व नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधित आस्थापना कार्यान्वित होणार आहेत. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर 360 कोटी मेट्रिक टन प्रतिवर्ष मालाची व 9 कोटी प्रवासी प्रतिवर्ष याप्रमाणे वाहतूक नियोजित आहे. विमानतळाचे काम पूर्ण होत आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच नवी मुंबई विमानतळाला भेट दिल्यानंतर आता या विमानतळावरील इमिग्रेशन चेक पोस्टसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर 285 पदे नव्याने निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे.

अशी आहेत पदे
पोलीस निरीक्षक - 20
पोलीस उपनिरीक्षक - 55
सहायक पोलीस उपनिरीक्षक - 30
पोलीस हवालदार - 60
पोलीस शिपाई - 120

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.