राज्य उत्पादन शुल्कच्या तीन उप अधीक्षकांना पदोन्नती
हर्षवर्धन शिंदे धाराशिवचे अधीक्षक
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या पदस्थापना देण्यात आली आहे. शासनाचे सह सचिव रवींद्र औटे यांच्या सहीने गुरुवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
पदोन्नतीने बदली झालेले अधिकारी :
हर्षवर्धन बाळकृष्ण शिंदे : अधीक्षक, धाराशिव
बाबासाहेब निवृत्ती भूतकर : अधीक्षक, सातारा
संजय आर. पाटील : अधीक्षक, परभणी
धाराशिवच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेले शिंदे मूळचे कोल्हापूरचे आहेत. सांगली एलसीबीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे ते जावई आहेत. श्री. शिंदे यांनी सांगली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्कचे उपाधीक्षक म्हणूनही काम केले आहे. धडाकेबाज अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.