Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्नीने प्रियकरासह मिळून केला पतीचा खून

पत्नीने प्रियकरासह मिळून केला पतीचा खून

धाराशिव : खरा पंचनामा

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा अपघाताचा बनाव करीत खून केल्याची घटना जागजी (ता. धाराशिव) येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी व तिच्या प्रियकरासह चार जणांना अटक करीत बुधवारी (ता. ३०) न्यायालयात हजर केले. त्यांची सात दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. रामचंद्र अशोक पवार (रा. जागजी, ता. धाराशिव) यांचा २१ जुलै २०२५ ला रात्री साडेदहाला अपघाती मृत्यू झाला.

त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीला धडक दिल्याने रामचंद्र पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद २६ जुलैला करण्यात आली. मात्र, पोलिस उपनिरीक्षक जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र पवार यांचा खून झाल्याचा संशय बळावला.

तपासात मृताच्या पत्नीचे गावातील परमेश्वर धनंजय नवले याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याच कारणावरून हा खून झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी परमेश्वर नवले (वय ३५) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली.

नवले याच्यासह मृताची पत्नी, ओमप्रकाश संजयकुमार सावतर (वय १८), सुनील नरसिंग देशमुख (वय २१, सर्व रा. जागजी, ता. धाराशिव) यांनी खून केल्याची कबुली दिली. ढोकी पोलिस ठाण्यात २९ जुलैला खुनाचा गुन्हा नोंद करीत या चारही आरोपींना अटक केली. बुधवारी (ता. ३०) चारही आरोपींना कनिष्ठ न्यायालय, धाराशिव येथे हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.