"तुम्ही मराठा समाजाच्या नादी लागले म्हणून..."
शिवराज बांगर यांचा धनंजय मुंडेंवर घणाघात
बीड : खरा पंचनामा
धनंजय मुंडे तुम्ही मनोज जरांगे पाटलांना शिव्या घालताय, परंतु तेच महादेव मुंडेंना न्याय देण्यासाठी परळीत आले. तुम्ही अजूनही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही. तुमच्या घरापासूरन महादेव मुंडेंचं घर ४०० मीटरवर आहे. खऱ्या अर्थाने वंजारी समाज तुम्हीच बदनाम केला, असा घणाघात वंजारी समाजाचे युवा नेते शिवराज बांगर यांनी केला.
सोमवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवराज बांगर बोलत होते. ते म्हणाले की, धनंजय मुंडेंच्या अगोदर पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या. परंतु त्यांनी कधीच कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं नाही. मात्र धनंजय मुंडेंनी हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली. गेली चार वर्षे मी त्यांचा अन्याय सहन करतोय.
वाल्मिक कराडने माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करुन मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं. परंतु सुदैवाने मी तसं काही केलं नाही. शेवटी माझ्या हत्येची सुपारी सनी आठवलेला देण्यात येणार होती. परंतु आठवलेने नकार दिल्याने हे होऊ शकलं नाही.
बांगर म्हणाले, या लोकांनी परळीचा बिहार करुन टाकला आहे. असे अनेक महादेव मुंडे, बापू आंधळे जीवानीशी गेले आहेत. बीड जिल्हा बदनाम झाला तो धनंजय मुंडेंमुळे आणि त्यांच्या काळ्या कारनाम्यांमुळे. तुम्ही, मनोज जरांगे पाटलांना तुम्ही शिव्या घातलाय, मात्र तेच महादेव मुंडेंच्या न्यायासाठी परळीत आले होतं.
"धनंजय मुंडेंच्या सगळ्या गोष्टी मी नामदेव शास्त्रींना सांगणार आहे.. वंजारा समाजातल्या ज्या ज्या लोकांवर अन्याय झाला त्या सगळ्यांना भगवानगडावर घेऊन जाणार आहे. नामदेव शास्त्रींनी घोषणा करुन धनंजय मुंडे हे भगवान गडाचे आहेत, असं म्हटलं होतं. त्याला आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्यांनी जो अन्याय केला, तो त्यांच्यासमोर मांडणार आहे." असं बांगर म्हणाले.
संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी मौन धारण केलं होतं. आता त्यांची प्रकृती बरी झाली आहे, त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. परळीमध्ये बिहारच्या पलीकडचा प्रकार सुरु आहे. समाजातल्या अनेकांचा या लोकांनी जीव घेतला. मात्र संतोष देशमुखांची हत्या करुन पहिल्यांदा ते मराठा समाजाच्या नादी लागले आणि त्यांचं सगळं बाहेर आलं. ही घटना घडली नसती तर यांनी रांग लाऊन लोकं मारले असते, असं शिवराज बांगर म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.