विद्यार्थ्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षिकेच्या मैत्रिणीला अटक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिकेनं 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर शारीरिक अत्याचार केल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी चांगलंच गाजलं होतं. अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास कथितपणे मदत करणाऱ्या महिलेला दादर पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला पश्चिम बंगालमध्ये गेली होती. तिथून तिला अटक करण्यात आली आहे. या महिलेनं मुलाला नैराश्याच्या गोळ्यांची शिफारस केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या या शिक्षिकेला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 अंतर्गत जूनच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हा दाखल झाला होता. पण, त्यानंतर तिला 22 जुलै रोजी जमीन मंजूर करण्यात आला आहे.
"सुरुवातीला, शिक्षिकेला मदत करणारी महिला परदेशी गेली असावी असे आम्हाला वाटले होते. परंतु, नंतर आम्ही तिचा पश्चिम बंगालमध्ये शोध घेतला," असे दादर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे.
या महिलेने सुरुवातीला पश्चिम बंगालमधील न्यायालयात धाव घेतली होती, ज्याने तिला अंतरिम जामीन मंजूर केला आणि तिला मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले. 23 जुलै रोजी तिने शहरातील सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले आणि तिला 6 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर मंगळवारी तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
"ही महिला 11 वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला भेटली होती आणि त्याला त्याच्या शिक्षिकेला भेटण्यासाठी प्रवृत्त केले होते, असे म्हटले होते की अशा गोष्टी आजकल सामान्य आहेत. तिने मुलासाठी 'डॅक्सिड 50' (Daxid 50) या अँटीडिप्रेसंटची शिफारस देखील केली होती," असे अधिकाऱ्याने सांगितले. विद्यार्थ्यावर शिक्षिकेने तिच्या सेडान कारमध्ये आणि नंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.