सांगलीत तरुणाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक, दोन अल्पवयीनही ताब्यात
अवघ्या बारा तासात शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसरात गुंड अजय कांबळे याच्या भावाच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवघ्या बारा तासात संशयितांना पकडल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
करण महादेव गायकवाड (वय २०, रा. राजीवगांधी नगर जुना बुधगांव रोड, सांगली), युवराज हनमंत कांबळे (वय १९, रा. टिंबर एरिया, नवीन वसाहत, भीमनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सौरभ बापू कांबळे (वय 20) असे खून झालेल्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी सौरभ आणि करण गायकवाड यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग करण याच्या मनात होता. शिवाय त्यांच्यात एकमेकांकडे रागाने बघण्यावरूनही वाद होत होता. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सौरभ वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसरात थांबला होता. त्यावेळी या दोन संशयितांसह दोन अल्पवयीन मुले तिथे आली. त्यांनी एडक्याने सौरभच्या मानेवर, पायावर सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून निघून गेले.
घटना घडल्यानंतर निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला संशयितांना शोधण्याच्या सूचना दिल्या. शाखेतील संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांना सौरभ याचा खून करणारे गायकवाड आणि त्याचे साथीदार टिम्बर एरिया परिसरात थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने तेथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी खुनाची कबुली दिली.
सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, योगेश पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, प्रशांत पुजारी, विशाल कोळी, योगेश हाक्के, संदीप कोळी, गणेश कोळेकर, दिग्विजय सांळुखे, रमेश लपाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.