जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर लावत केला विश्वविक्रम
मुंबई : खरा पंचनामा
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर राज्यभरात दहीहंडीचा थरार पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी गोविंदा पथके मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसातही गोविंदांचा उत्साह कमी झालेला नाही. दादरच्या आयडियल येथे महिला गोविंदांनी दहीहंडी फोडून खास क्षण साजरा केला.
ठाण्यातील संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला. यावेळी मैदानात एकच जल्लोष झाला.l
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "कोकण नगर पथकाने मराठी एकतेची खरी ताकद दाखवली. मी आधीच पारितोषिक जाहीर केले होते. या पथकाला २५ लाखांचे बक्षीस देत आहे. "त्यांनी पुढे सांगितले की, "विश्वविक्रम मोडण्यासाठीच असतो. याच मैदानावर आधीही विक्रम झाले आहेत आणि पुन्हा झाले."
कोकण नगर पथकानंतर आर्यन गोविंदा पथकानेही संस्कृतीच्या दहीहंडीत ९ थरांची सलामी दिली. तर यंदा या सोहळ्यात ऑपरेशन सिंदूर जनजागृती' करण्यात येत असून, 'शोले' चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष मानवंदना दिली जात आहे. यावेळी शोलेची प्रतिकृती पाहणाऱ्यांसाठी आकर्षण ठरली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.