गोंदियात झेंडावंदन करण्यास छगन भुजबळांचा नकार; 15 ऑगस्टसाठी आता शासनाच नवं परिपत्रक
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातएकीकडे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला असताना स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार यावरून देखील नाराजी नाट्य रंगल्याच्या चर्चा आहे. अशातच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होतं तर मंत्री भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्या बाबत सूचित करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी मंत्री भुजबळांनी नकार घंटा लावण्याने त्यांच्या ऐवजी आता मंत्री मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहे त. तसे शासनाकडून नव्याने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे. सध्या त्यांना हालचाल करणे शक्य नसल्याचीमाहितीसमोर आली आहे. त्यामुळे त्यांना ध्वजारोहणसाठी जाणे शक्य नव्हतं. त्यामुळे याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळांवर दिली होती. मात्र आता भुजबळांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण सोहळ्यासाठी जातील. अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सोमवारी जाहीर केली आहे. या यादीनुसार, रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगडमधून अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच मंत्री भरत गोगावले यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.