राहुल गांधी यांच्यानंतर शरद पवारांनी फोडला 160 जागांचा बॉम्ब...
मुंबई : खरा पंचनामा
दिल्लीत असताना दोघंजण माझ्याकडे विधानसभा निवडणुकीची ऑफर घेऊन भेटायला आले होते. यामध्ये त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्यानं सध्या मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील बोगस मतदारांची यादी दाखवत देशात खळबळ उडवून दिली होती. अशातच पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी आणखी एक बॉम्ब फोडला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर घेऊन दोघा जणांनी आपली भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी ही लोकं आले होते. पण आता माझ्याकडं त्यांची नावं आणि पत्ते नाहीत, असे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाच्या संस्थेबद्दल मला शंका नव्हती. असे लोक भेटत असतात पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असेही ते म्हणाले.
मात्र, त्यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली. त्या लोकांना जे जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. परंतू अशा प्रकारात आपण पडायला नको, असं आमचं आणि राहुल गांधी यांचे ठरलं, असा खुलासा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हा आपला रस्ता नाही, लोकांचा निर्णय असेल तो आपण स्विकारू, असे आमचं ठरलं, असे शरद पवार म्हणाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.