'जनावरांची वाहतूक करणारी वाहणं तपासू देऊ नका, गोरक्षकांना आवर घाला'
मुंबई : खरा पंचनामा
कायदेशीररित्या परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांना आवर घाला, तसंच जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणाऱ्या खासगी व्यक्तींना रोखावं, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
अजितदादांच्या या सुचनांमुळे आता स्वयंघोषित गोरक्षकांवर पोलिसांच्या वॉच राहणार आहे. राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री करणाऱ्या कुरेशी समाजाला गोरक्षकांकडून त्रास दिला जातं असल्याचा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आला आहे. यासाठी नुकतंच राज्यभरात कुरेशी समाजाकडून मुक मोर्चा काढण्यात आले होते.
म्हशींच्या खरेदी-विक्रीवेळी गोरक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या विरोधात हे मोर्चे काढण्यात आले होते. अशातच कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपल्या अडचणी सांगितल्या. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर कथित गोरक्षक कायद्याच्या आडून जनावरांच्या वाहतुकीची वाहनं अडवतात आणि पैसे मागतात.
तसंच बेकायदेशीर गोरक्षकांवर बंदी घालावी, कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीला संरक्षण द्यावे आणि वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत, अशा विविध मागण्या कुरेश समाजाच्या शिष्टमंडळाने अजितदादांकडे केल्या.
या बैठकीला राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. दरम्यान, या बैठीकत उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांनी रश्मी शुक्ला यांना या संदर्भात एक पत्रक काढण्याची सूचना दिली.
ज्यामध्ये कायद्याने परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार खासगी व्यक्तींना नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना या पत्रकाद्वारे पोलिसांना देण्याचे आदेश अजितदादांनी दिले.
दरम्यान, यावेळी अजितदादांनी कुरेशी समुदाय पारंपरिकपणे मांस व्यापाराशी संबंधित असून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेचा भाग असल्याचंही म्हटलं. त्यामुळे या समुदायाच्या व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.