Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला रावसाहेब पाटील यांचा वाढदिवसराजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व, भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य व दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस  विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात आणि मोठ्या लोकसहभागातून साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि मित्रपरिवारांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 
उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजपा महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा सौ. नीता केळकर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई शिंदे, माजी नगरसेवक आयुब पठाण, माजी नगरसेवक राजेश नाईक, ज्येष्ठ करसल्लागार किशोर लुल्ला, प्राचार्य डॉ. डी. डी. चौगुले, लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड. सुहास पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, दक्षिण भारत जैन सभेचे डॉ. अजित पाटील,  तसेच माजी महापौर सुरेश पाटील, शांतीसागर पतसंस्था समडोळीचे चेअरमन सुरेश पाटील, राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉ. रमेश ढबू, अॅड. एस. पी. मगदूम, हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष नितीन शिंदे, शैलेश पवार, दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे पदाधिकारी, केमिस्ट संघटनेचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष विनायक शेटे, अजित सगळे, महावीर खोत, मनन कन्स्ट्रक्शनचे सागर वडगावे, जिव्हाळा ग्रुपचे मनोहर सारडा व सर्व सदस्य, कर्मवीर पतसंस्थेचे एमडी अनिल मगदूम व विविध शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग, सुनील पाटील (मल्लेवाडी), प्रगती व जिनविजयचे संपादक प्रा. एन. डी. बिरनाळे, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक रविंद्र वळवडे, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव विनोद पाटोळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. बाळासाहेब चोपडे, डॉ. आशुतोष चोपडे, राजगोंडा पाटील (घुमट नांद्रे), जवाहर पाटील वसगडे , आष्टा पीपल्स बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दिलीप वग्यानी, भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी नगरसेवक मयूर पाटील, सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमन बाळासाहेब पवार, विराचार्य पतसंस्थेचे संचालक मोहन नवले, प्रकाश सांगावे, भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच नांद्रे, वसगडे, भिलवडी, डिग्रज, समडोळी, कोथळी, जयसिंगपूर आदी भागांतील मान्यवरांचा समावेश होता. विविध वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
वाढदिवस आणि वर्धापन दिनानिमित्त गणेश नगर चारिटेबल ट्रस्ट व जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश नगर हॉल येथे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचबरोबर अनाथ आश्रमात फळ वाटप करण्यात आले,  तसेच इंसाफ फाउंडेशनना आर्थिक मदत आणि निर्धार फाउंडेशनला सहाय्य देण्यात आले. दूरध्वनी, पत्रव्यवहार व सामाजिक माध्यमांतून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पाठवल्या.

रावसाहेब पाटील यांनी सर्व मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचा संगम असलेला हा वाढदिवस, उपस्थिती व उपक्रमांमुळे विशेष संस्मरणीय ठरला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.