Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य सरकारच स्वातंत्र्यदिनापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

राज्य सरकारच स्वातंत्र्यदिनापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून एकापाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेतले जात आहे. आता केंद्रानंतर राज्यातील महायुती सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे. राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्याची घोषणा करत सरकारी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे.

केंद्र सरकारनं मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 3% वाढीनंतर, शेवटच्या अपडेटमध्ये महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 53 टक्के झाला, त्यानंतर मार्च महिन्यातील वाढीनंतर तो 55 टक्क्यांवर पोहोचला आहे.

केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान वाढ लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता राज्य सरकारचा महागाई भत्ताही 53 टक्क्यावरुन 55 टक्के झाला आहे.

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्यात निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांना होणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 असे एकूण 08 महिन्यांची डी. ए. थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.