गणेशोत्सव, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा कारवाईचा डबल धमाका
इस्लामपूर पाठोपाठ वडगाव मावळमधील किरण मोहितेसह टोळीतील सहाजणांवर मोकाची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
गणेशोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मोका कारवाईचा डबल धमाका केला. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश पवार याच्यासह टोळीतील दहाजणांवर मोकाअंतर्गत कारवाई केली. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील गणेश मोहिते याच्यासह 6 जणांवर मोकाची कारवाई करून कोल्हापूर परीक्षेत्रातील गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे.
पुणे ग्रामीणमधील किरण एकनाथ मोहिते (वय 26), एकनाथ अर्जुन मोहिते (वय 53), रविंद्र लक्ष्मण मोहिते (वय 33), मयूर ऊर्फ चण्या बजरंग मोढवे (वय 26), करण रमेश पवार (वय 25), सुशांत अनिल साबळे वय 24, सर्व रा. वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे) यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर सांगली जिल्ह्यातील ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञानेश भिमराव पवार (वय २४), चेतन पांडुरंग पवार (वय २४), पंकज नामदेव मुळीक, प्रतिक उर्फ गणेश महादेव पालकर (वय २४), युवराज दयानंद कुंभार (वय २३), रोहन उर्फ वैभव सुभाष कांबळे (वय २४), किसन उर्फ सोन्या संजय कुचीवाले (वय १८), प्रथमेश संकाप्पा कुचीवाले, प्रेम उर्फ विश्वजित सुभाष मोरे, गुरुदत्त राजेंद्र सुतार (सर्व रा. इस्लामपूर) यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली.
सण आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईचा दणका देण्याचा इशारा या कारवाईतून महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे. गणेशोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी इस्लामपूर तसेच वडगाव मावळ येथील टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर नजर ठेवून या टोळ्या कायमच्या नष्ट करण्यात येतील. गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महानिरीक्षक फुलारी यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.