राज्यातील १७ पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती
अशोक भवड यांची तासगावला तर एसीबीचे अनिल कटके यांची गेवराईला बदली
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील १७ पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. कुपवाड एमआयडीसीचे तत्कालीन प्रभारी अधिकारी अशोक भवड यांची तासगावचे उपविभागीय अधिकारी म्हणून तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सांगलीचे अनिल कटके यांची गेवराईचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने बदल्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत.
पदोन्नतीने बदली झालेले अधिकारी ः
राजेश देवरे ः सहायक पोलिस आयुक्त मुंबई
हनुमंत गिरमे ः सहायक पोलिस आयुक्त अमरावती
अशोक भवड ः उपविभागीय पोलिस अधिकारी तासगाव
मोहन पाटील ः सहायक पोलिस आयुक्त ठाणे
संजय पाटील ः पोलिस उपअधीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
यशवंत बाविसकर ः उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण
प्रमोद बाबर ः सहायक पोलिस आयुक्त मुंबई
रमेश जायभाये ः पोलिस उपअधीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
सुभाष ढवळे ः उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्ताईनगर
कुंदनकुमार वाघमारे ः उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली शहर
दिलीप पवार ः सहायक पोलिस आयुक्त सोलापूर
अनिल पाटील ः सहायक पोलिस आयुक्त मुंबई
राजेंद्र पाटील ः सहायक पोलिस आयुक्त अमरावती
भिमराव खंडाळे ः सहायक पोलिस आयुक्त मुंबई
मुक्तार दाऊद शेख ः पोलिस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी
विलास काळे ः उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा
अनिल कटके ः उपविभागीय पोलिस अधिकारी गेवराई.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.