Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'भारत - पाकिस्तानमधील युद्ध मीच थांबवले'

'भारत - पाकिस्तानमधील युद्ध मीच थांबवले'

दिल्ली : खरा पंचनामा 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर, जे अणुयुद्धात बदलू शकले असते, मात्र ती परिस्थिती आपण हाताळल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला. काल व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी असाही दावा केला की, या संघर्षादरम्यान पाच किंवा सहा विमाने पाडण्यात आली होती."

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले नाही की, नष्ट झालेली विमाने भारताची होती की पाकिस्तानची होती किंवा ते दोन्ही देशांच्या नुकसानीबद्दल बोलत होते. भारत असे म्हणत आहे की दोन्ही देशांनी (भारत-पाकिस्तान) परस्पर चर्चेद्वारे त्यांची लष्करी कारवाई थांबवली आहे आणि यामध्ये अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव्ह आणि आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांच्या उपस्थितीत हे विधान केले. हे तिन्ही नेते त्रिपक्षीय स्वाक्षरी समारंभाला उपस्थित होते, जिथे अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी ट्रम्प म्हणाले, 'राष्ट्रपती म्हणून माझी सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा जगात शांतता आणि स्थैर्य आणणे आहे. भारत आणि पाकिस्तानसोबतच्या आमच्या यशानंतर आजचा करार झाला आहे.'

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, 'ते एकमेकांविरुद्ध पूर्ण ताकदीने लढत होते, परिस्थिती खूप गंभीर झाली होती, पण तुम्हाला माहिती आहेच की, एक मोठा संघर्ष होऊ शकला असता कदाचित अणुयुद्धही होऊ शकले असते, पण त्याआधीच दोन्ही महान नेते एकत्र आले आणि परिस्थिती हाताळली.'

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितले की त्यांनी व्यापार कराराद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवला. ते म्हणाले, 'मी भारत आणि पाकिस्तानमधील प्रकरण सोडवले. मला वाटते की याचे मुख्य कारण व्यापार होते, इतर कोणत्याही कारणासाठी नाही.' या कार्यक्रमात त्यांनी आपल्या वक्तव्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचा दोनदा उल्लेख केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.