"...म्हणून वाल्मिक कराडला जामीन नको"
बीड : खरा पंचनामा
संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर सोमवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. तब्बल तीन तास या प्रकरणी युक्तिवाद सुरु होते. आता पुढची सुनावणी येत्या ३० तारखेला होणार आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सोमवारी कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केला. वाल्मिक कराडला जामीन का नको, यावर त्यांनी कोर्टात विवेचन केलं. वाल्मिकला जामीन मिळाला तर या प्रकरणातल्या साक्षीदारांवर दबाव आणला जाईल, त्यामुळे जामीन नकोच, अशी भूमिका अॅड. निकम यांनी घेतली.
आरोपी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद, तसेच इतर आरोपींनी केलेल्या दोषमुक्तीचा अर्जावरही युक्तिवाद संपन्न झाले. दोन्ही प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलेला नाही. या प्रकरणाची पुढची सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.
दरम्यान, सुरुवातीला वाल्मिक कराडने दोषमुक्तीचा अर्ज कोर्टात दाखल केला होता. त्यावर अनेक दिवस सुनावण्या झाल्यानंतर कोर्टाने तो अर्ज फेटाळून लावला. सोबतच वाल्मिक कराड प्रथमदर्शनी दोषी असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. त्यानंतर पुन्हा एका आरोपीने दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. मात्र सरकारी वकिलांनी या प्रक्रियेला विरोध केला. त्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना एकत्रित दोषमुक्तीचा अर्ज करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सर्व आरोपींच्या अर्जावर एकत्रित सुनावणी होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.