Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील चार ते पाच प्रभारींची होणार उचलबांगडी?कामाचे 'भांडवल'ही येणार नाही कामी : इच्छुकांचे देव पाण्यात

सांगलीतील चार ते पाच प्रभारींची होणार उचलबांगडी?
कामाचे 'भांडवल'ही येणार नाही कामी : इच्छुकांचे देव पाण्यात 

सांगली : खरा पंचनामा 

राज्य शासनाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सूरूच आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच प्रभारी अधिकाऱ्यांची उचल बांगडी होण्याची शक्यता आहे. या प्रभारीना त्यांनी केलेल्या कामाचे 'भांडवल'ही कामी येणार नसल्याची चर्चा आहे. दरम्यान प्रभारी पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी देव पाण्यात घातले असून नेत्यांचे उंबरे संबंधितांकडून झिजवले जात असल्याचीही चर्चा आहे.

कोल्हापूर परीक्षेत्रातील अधिकाऱ्यांना आता बदल्यांचे वेध लागले आहेत. येत्या काही दिवसात या बदल्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चांगले पोस्टिंग मिळवण्यासाठी इच्छुक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

सांगलीतील उचलबांगडी होणारे ते अधिकारी कोण अशी विचारणा पोलीस दलाच्या वर्तुळात एकमेकांना केली जात आहे. कोणाच्या कामाचे काय 'भांडवल' आहे आणि तेच त्याच्या बदलीला कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय पडद्यामागे केलेल्या करनाम्यांची यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संबंधितांच्या हितचिंतकांनी पोहोचवली असल्याचीही चर्चा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर परीक्षेत्रातील बदल्या झाल्यानंतरच उचलबांगडी झालेल्यांचे नेमके काय 'भांडवल' होते हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गुन्हे दाखल करण्यात दाखवलेली तत्परता (?), मर्जीतील अंमलदारांना दिलेले विशेष अधिकार (?), तक्रारींच्या अर्जात घेतलेली न्यायिक (?) भूमिका, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश, सूचनांचे पालन (?) अशा अनेक बाबींचा विचार उचलबांगडी करताना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या निकषात बसणाऱ्यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.