Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्था'वर... गणरायाचं घेतलं दर्शन

उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्था'वर... गणरायाचं घेतलं दर्शन

मुंबई : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे तसेच आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातूनही बघितलं जातं आहे.

राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीचं आगमन झालं आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन गणपती दर्शनासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारुन आता उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर आले आहेत. उद्धव ठाकरे हे दुपारी राज ठाकरे यांच्या घरी जेवणारसुद्धा आहेत.

मागच्या दोन महिन्यांतली दोघांची ही तिसरी भेट आहे. मराठी विजय मेळाव्याला दोघेही २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या निवासस्थान गेले होते. आता गणरायाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

दोघांच्या या भेटींकडे राजकीय दृष्टीकोनातूनही बघितलं जातं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन महत्त्वाचं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवतीर्थवरील या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही राजकीय चर्चा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.