Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पळाला; ६ पोलीस कर्मचारी निलंबित

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पळाला; ६ पोलीस कर्मचारी निलंबित

ठाणे : खरा पंचनामा

ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना कळवा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना गंभीर त्रुटी केल्याप्रकरणी ठाणे पोलीस दलातील नऊ पोलीस कर्मचारी निलंबित झाले.

असे असतानाच आता, भिवंडीत बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याने ६ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसात एकूण १५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील ५ आरोपींना भिवंडी न्यायालय येथे ४ ऑगस्ट रोजी ५ आरोपी हजर करण्यासाठी ठाणे पोलिसांनी पथक नेमले होते. यातील महिला पोलीस शिपाई संगिता अशोक चोखंडे यांच्याकडे एस.एल.आर. रायफल आणि ५० जिवंत काडतुसे देण्यात आली होती तर, पोलीस शिपाई विकास प्रेमराव चाटे यांच्याकडे तीन बेडी देण्यात आल्या होत्या. हे पथकाच्या ताब्यात असलेल्या आरोपीमध्ये भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या आरोपाखाली अटक असलेल्या सलामत अली अन्सारी (३२) याचा समावेश होता.

सलामत हा भिवंडीतील फेणेगावात राहत होता. तो मूळचा बिहार राज्यातील मधुबन जिल्ह्याचा रहिवाशी होता. त्याला पथकाने न्यायालयात हजर केले असता, तो गर्दीचा फायदा पोलिसांच्या रखवलीतून पळून गेला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीवर आणि त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले नाही आणि कायदेशीर रखवालीतून पळून गेला. यामुळे कर्तव्यावर सतर्क न राहता निष्काळजीपणा आणि हालगर्जीपणाचे कृत्य करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्र.३ (तीन) चे उल्लंघन केले आहे, असा ठपका पथकातील ६ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. पोलीस हवालदार अमोल बाळासो तरटे, पोलीस शिपाई मोतीराम दत्ता ढेबरे, पोलीस शिपाई दत्ता बबनराव सरकटे, पोलीस शिपाई दिपक शिवदास इंगळे, पोलीस शिपाई विकास प्रेमराव चाटे, महिला पोलीस शिपाई संगिता अशोक चोखंडे यांचा समावेश आहे. ठाणे पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी ही कारवाई केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.