Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यापदोन्नती नाकारणाऱ्यांना केले साईड पोस्ट

सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पदोन्नती नाकारणाऱ्यांना केले साईड पोस्ट

मुंबई : खरा पंचनामा

मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोस्टिंग देण्यात आले असून शनिवारी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

त्याचसोबत ज्येष्ठतेनुसार पोलीस निरीक्षकांची रिक्त झालेल्या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली दाखविण्यात आली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलात काही दिवसांपूर्वी 156 निःशस्त्र पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात मुंबईतील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांचा पदोन्नतीनंतर मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबईत पोलीस दलात फेरबदल केले आहे. पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना विविध ठिकाणी पोस्टिंग देण्यात आल्या. तसेच सहायक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती नाकरणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पोलीस ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांना साईड पोस्टिंग देण्यात आली आहे.

सेवा ज्येष्ठतेनुसार निःशस्त्र पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा दर्जा देऊन रिक्त झालेल्या पोलीस ठाण्यात पोस्टिंग देण्यात आली आहे. पदोन्नती नाकरणारे साईड पोस्टिंगवर सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या मुंबई पोलीस दलातील सुमारे 30 अधिकाऱ्यांना पोस्टिंग देण्यात आली आहे. तसेच पदोन्नती नाकारणाऱ्या 23 पोलीस निरीक्षकांची पोलीस ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांची सशस्त्र विभाग, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक आणि संरक्षण आणि सुरक्षा येथे बदली करण्यात आली आहे.

मुंबईतील विविध पोलीस ठाण्यातील सुमारे 100 निशस्त्र पोलीस निरीक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा दर्जा देण्यात आला असून त्यांची पोलीस ठाणे, सशस्त्र विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.