Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार विजयसिंह पंडित समर्थकांनी फोडली हाकेंची गाडी

आमदार विजयसिंह पंडित समर्थकांनी फोडली हाकेंची गाडी

बीड : खरा पंचनामा

राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. एकीकडे मुंबईतील आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असतानाच बीडमधील गेवराई तालुक्यात सोमवारी (ता. 25) मराठा विरुद्ध ओबीसी वाट पेटल्याचं समोर आलं आहे.

गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडीत यांचे समर्थक आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे समर्थक भिडल्याचं दिसून आलं. यावेळी पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंच्या गाडीवर दगड आणि चप्पल फेकल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई बॅनर लावण्यात आले होते. त्या वरून हा गोंधळ आहे. पंडित यांच्या समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत लक्ष्मण हाकेंच्या गाडीची पुढील काच फुटल्याचं दिसून येत आहे. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरु आहेत.

पोलिसांकडून गेवराईत सुरु असलेला हा राडा रोखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. आंदोलक हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर त्यांचे आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी हाके यांनी पंडित यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं. तर दुसरीकडे पंडित समर्थकांनी हाकेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हा वाद गेवराई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानं निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी पंडित यांच्या समर्थकांनी हाकेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तर यावेळी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाकेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, लक्ष्मण हाके यांनी काही हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी मला आव्हान देत टीका केली होती. त्यानंतर सातत्यानं त्यांच्याकडून माझ्याविरोधात वक्तव्य केली जात आहे. एकदा दोनदा कितीदा सहन करणार आहे. त्याचमुळे माझ्या सहकारी, समर्थकांची ही रिअॅक्शन असल्याचंही पंडित म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.