अनिल अंबानी यांच्या घरावर ईडीनंतर आता सीबीआयचा छापा
मुंबई : खरा पंचनामा
उद्योजक अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत आहेत. शनिवारी सकाळी ७वाजल्यापासून आरकॉम आणि अनिल अंबानी यांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. सीबीआय पथकाने ही छापेमारी केली आहे.
बँक फसवणूक प्रकरणात सीबीआय आरकॉम आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित जागेची झडती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी त्यांच्या कुटुंबासह घरात उपस्थित आहेत. १७००० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात अनिल अंबानींविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत झालेल्या २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स टेलिकॉमने एसबीआयसह अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा गैरवापर केला असल्याचा आरोप आहे. हे कर्ज परत न केल्याने बँकांना मोठे आर्थिक नुकसान झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाने या खात्याला 'फसवणूक' म्हणून घोषित केल्यानंतर हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले. सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला गती दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.