Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची कन्या, राष्ट्रीय नेमबाजपटू शरयू मोरे हिचे अपघाती निधन

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची कन्या, राष्ट्रीय नेमबाजपटू शरयू मोरे हिचे अपघाती निधन

सांगली : खरा पंचनामा

राष्ट्रीय नेमबाज, रिनाऊंड शूटर शरयू संजय मोरे (वय २२) हिचे बारामती येथे अपघाती निधन झाले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या यांची ती कन्या होत. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

शरयूने नीट परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवले होते. बारामती येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती. काल रात्री बारामती येथे तिच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शरयू आणि तिचा भाऊ आदित्य या दोघांनाही निष्णात (रिनाऊंड शूटर) होण्याचा बहुमान मिळवला होता. या स्पर्धेत देशभरातून हजारांवर खेळाडू पात्र ठरले होते. खडतर समजल्या जाणाऱ्या १२ बोअर शॉटगन-ट्रॅप या क्रीडा प्रकारात शरयू हिने दैदिप्यमान यश मिळविले. विजेतेपद मिळवून निष्णात नेमबाज होण्याचा बहुमान मिळवणारी ती पश्चिम महाराष्ट्रीतील पहिली नेमबाज ठरली. तिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी पाच सुवर्ण, एक रौप्य, तर दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे.

केवळ २२ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर नाव गाजवणारी शरयू, तिच्या मेहनतीने, जिद्दीने आणि यशस्वी कामगिरीने सांगलीसह सातारा जिल्ह्याचे नाव देशभरात पोहचवले होते. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज होत असतानाच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या आकस्मिक जाण्याने मोरे कुटुंबयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस दलातही या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून, शरयूच्या रूपाने एक तेजस्वी तारा गमावल्याची भावना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.