अखेर पोलिस भरतीचा जीआर निघाला
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीस हिरवा कंदील दर्शविण्यात आलेला असून १५ हजार ६३१ पद भरतीचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे. एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे भरण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयाने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई तसच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते दि 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांकः पोलिस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट, 2025 दि.01 जानेवारी 2025 ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.
पदनाम : रिक्त पदांची संख्या
1. पोलिस शिपाई : 12399
2. पोलिस शिपाई चालक : 234
3. बॅण्डस्मन : 25
4. सशस्त्र पोलिस शिपाई : 2393
5. कारागृह शिपाई : 580
एकूण 15631
शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलिस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.