पोलीस कार उलटून 1 अंमलदार ठार, 2 जखमी
धुळे : खरा पंचनामा
धुळे जिल्ह्यात पोलिस वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर दहिवद गावाजवळ महामार्ग वाहतूक शाखा शिरपूर यांचे बोलेरो वाहन क्रमांक MH18 BX 0232 चे मागील टायर फुटल्याने वाहन पलटी झाले.
वाहन पटली होऊन झालेल्या या अपघातात 1) नवल वसावे 2) प्रकाश जाधव 3) अनिल पारधी असे तीन पोलीस अंमलदार जखमी झाले होते. त्यानंतर, तात्काळ त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
अपघातातील गंभीर जखमी नवल वसावे यांच्यावर शिरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं शिरपूर पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.
पोलिस गाड्या ह्या सुरक्षित आणि उत्तम असायला हव्यात, पण पोलिसांच्या कारचे टायर फुटून अपघात होत असले तरी ही गंभीर बाब असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
दरम्यान, अपघाताच्या घटनेचा तपास केला जात असून इतर जखमी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरही रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.