Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सांगली जिल्हा पोलीस दल राज्यात अव्वलमहासंचालकांच्याहस्ते अधीक्षक संदीप घुगे, सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांना चषक प्रदान

सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सांगली जिल्हा पोलीस दल राज्यात अव्वल
महासंचालकांच्याहस्ते अधीक्षक संदीप घुगे, सहायक निरीक्षक रुपाली बोबडे यांना चषक प्रदान

पुणे : खरा पंचनामा

पुणे येथे नुकताच राज्य पोलीस दलाचा कर्तव्य मेळावा पार पडला. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर महासंचालकांद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यात सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वित आहे. राज्यातील सर्व घटकांचे मुल्यांकन करून २०२४-२५ वर्षात सांगली जिल्ह्याने १४ वेळा पहिल्या तीन क्रमांकात स्थान प्राप्त केले आहे. या प्रणाली संचलनाबाबत उत्कृष्ट कार्य करत यावर्षी सांगली जिल्ह्याने सीसीटीएनएस प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पुण्यातील मेळाव्यात राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याहस्ते सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी रुपाली बोबडे यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला.

सीसीटीएनएस कार्यप्रणाली अंतर्गत प्रभावीदैनंदिन वापर, अचुकता, अद्ययावत माहिती भरणे, नागरिकांच्या ई-तक्रारी याबाबत जलद निर्गती करण्यात सांगली पोलीस दल यशस्वी ठरले. नागरिकांना असुविधा न होता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून हे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी अधीक्षक घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. अधीक्षक घुगे, अपर अधीक्षक बारवकर, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, नितीन बराले, सलमा इनामदार यांनी या प्रणालीच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून कामकाजात सातत्याने सुधारणा केली. त्यामुळेच सांगली जिल्हा सीसीटीएनस (क्राइम अॅंड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणालीत राज्यात अव्वल ठरला आहे.

या कर्तव्य मेळाव्यास सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक (वायरलेस) दीपक पांडे, पुणे शहरचे आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्याच्या या कामगिरीबाबत महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी सांगली टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.