तो म्हणतो, मेरे पास बंगला, कार है; ती म्हणते, मेरे पास तेरे जैसे चार है!
बार्शी : खरा पंचनामा
ज्या नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर गोविंद बरगे यांनी लाखो रुपये उधळूनसुद्धा तिने गोविंद यांनी बांधलेला बंगला नावावर करा यासाठी हट्ट धरला होता. त्यामुळे तिने गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले होते याच नैराश्यातून गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली.
जिच्यामुळे गोविंद यांनी आत्महत्या केली त्या पूजा गायकवाडचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पूजाला म्हणतो की, मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है? त्यावेळी पूजा त्या व्यक्तीस उत्तर देते, मेरे पास तेरे जैसे चार है, असे हटलेला व्हिडीओ सध्या व्हायरल झाला.
लुखामसला (ता. गेवराई, जि. बीड) येथील माजी उपसरपंच गोविंद बरगे यांनी ९ सप्टेंबर रोजी पहाटे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सासुरे तालुका बार्शी येथे घडली होती. गोविंद बरगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुळजाभवानी कला केंद्र पारगाव ता. वाशी, जि. धाराशिव येथील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला.
नर्तिकी पूजा हिला ताब्यात घेऊन वैराग पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या आत्महत्येप्रकरणी पुढील तपास सपोनि विश्वजित जगदाळे करीत आहेत.
गोविंद हे सासुरे येथे सोमवारी रात्री उशिरा आले होते पण त्याच रात्री पासून पहाटेच्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केली. यावेळी नर्तकी पूजा नेमकी तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथे होती का, सासुरे येथे होती, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याचा तपास लावण्याचे आव्हान वैराग पोलिसांसमोर आहे.
लुखामसाला येथील माजी उपसरपंच यांनी सासुरे येथे आत्महत्या केली होती. त्यांच्या पार्थिवाचे विच्छेदन सोलापूर येथे केल्यानंतर त्यांच्या मूळ गावी काल अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील मान्यवरांसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
शवविच्छेदनाचा अहवाल वैराग पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात फायर आर्म इंजुरी टू हेड असे नमूद करण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीमकडून कार क्र. एमएच २३ बी एच ५०२० या गाडीत गोविंद बरगे यांनी ज्या पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली त्या पिस्तुलाच्या गोळीचा पुढील भाग मिळून आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.