Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वांगचुक पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात; बांगलादेशचा दौरालडाखच्या डीजीपींचा धक्कादायक खुलासा

वांगचुक पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात; बांगलादेशचा दौरा
लडाखच्या डीजीपींचा धक्कादायक खुलासा

लेह : खरा पंचनामा

लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना हिंसा भडकविल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्यांच्या एनजीओला परदेशातून फंडिंग होते होते. परंतु त्यात अनेकदा उल्लंघन झाल्याप्रकरणी त्यांचा एनजीओचा परवानाही केंद्र सरकारने रद्द केलाय. तर आता लडाखचे डीजीपी एसडी सिंह जमवाल यांनी वांगचुक यांच्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. वांगचुक हे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. त्यांनी बांगलादेशचा दौरा केला असल्याचा धक्कादायक खुलासा डीजीपींनी केलाय.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर लडाखमध्ये तरुणांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर चार जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर वांगचुक यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. आता डीजीपी जमवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, आंदोलनामुळे हिंसा भडकली. पाच ते सहा हजार लोकांनी सरकारी कार्यालये, राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ला केला. त्यात चार लोकांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यात पोलिस, निमलष्करी दलाचे जवानही जखमी झाले.

24 सप्टेंबरला झालेली घटना चुकीची आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली परिस्थिती चिघळवली. त्यात सोन वांगचुक हे एक आहेत. ते परदेशातील लोकांच्या संपर्कात होते. त्याबाबत चौकशी सुरू आहे. यात दोन जण पकडण्यात आले आहेत. कट रचण्यात सहभागी झाले होते. येथे नेपाळी नागरिक हे मजुरीसाठी आलेले आहेत. त्यांच्याही चौकशी केली जाणार आहे. आता लडाखमध्ये कर्फ्यू असून, तो हटविण्याचा प्रयत्न असणार आहे. वांगचुक हे पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचा संशय आहेत. तसेच त्यांनी बांगलादेशचा दौरा केल्याचे जमवाल यांनी म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.