Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया दो ये मटका.."DJ वर गाणं लावून आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनाचा घेतला बदला

"टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया दो ये मटका.."
DJ वर गाणं लावून आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनाचा घेतला बदला

पुणे : खरा पंचनामा

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. शुक्रवार रात्री नाना पेठ नवरंग मित्र मंडळाजवळ झालेल्या भीषण हल्ल्यात गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर (रा. नाना पेठ) याचा पिस्तूलातून तीन गोळ्या झाडून व कोयत्याने वार करुन खून करण्यात आला.

गोविंदचा पिता गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे आंदेकर टोळीने त्याच्या मुलगा टार्गेट करून 'गेम' केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे टोळीने रेकी एका परिसरात केली होती, मात्र प्रत्यक्ष हल्ला दुसरीकडे घडवून आणला.

धक्कादायक बाज म्हणजे, "टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया दो ये मटका.. हे गाणं डीजे वर वाजवत मर्डर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, आंदेकर टोळीने पूर्वीच आंबेगाव पठार परिसरात रेकी केली असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली होती. या भागात वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आदी १३ जणांची घरे आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे (रा. गणेश पेठ) याला पकडून चौकशी केली असता, त्याच्याकडून हा धक्कादायक प्रकार समोर आला.

वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्याची आग आंदेकर टोळीत धुमसत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. उत्सव काळात झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे पोलिस बंदोबस्त आणि गुन्हेगारी हालचालींवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.