सांगली बस स्थानक परिसरात नियम मोडणाऱ्या 18 वाहनांवर वाहतूक शाखेचा बडगा
29 हजारांचा दंड वसूल : पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी
सांगली : खरा पंचनामा
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसराच्या दोनशे मीटर अंतरातील नो पार्किंग झोनचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18 प्रवासी वाहतूक वाहनांवर कारवाई करून 29 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली.
बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने 200 मीटर पार्किंगचा नियम मोडून प्रवासी वाहतूक करत असल्याची तक्रार एसटी महामंडळाने वाहतूक पोलिसांकडे केली होती. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक कुलकर्णी शनिवारी अवैध प्रवासी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. 18 वाहनांवर कारवाई करत 29 हजार रूपयांचा दंड आकारणी करण्यात आली आहे.
येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसराच्या दोनशे मीटर अंतरावर नो पार्किंग झोन आहे. याठिकाणी अवैधरित्या प्रवासी वाहने उभी केली जातात. त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला होता. याबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता अधिकारी नं. ज्ञा. पाटील यांनी पोलिसांकडे पत्राद्वारे केली. तसेच त्यांच्या पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान आढळलेल्या वाहनांची यादीही पोलिसांकडे दिली होती. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक कुलकर्णी यांच्या पथकाने आज कारवाई केली. बसस्थानक परिसरातील दोनशे मीटर अंतरात प्रवासी वाहने दिसून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही निरीक्षक कुलकर्णी यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.