Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकाच घरात 200 मतदार, नागपूरमधील मतदार यादीतील घोळ उघड

एकाच घरात 200 मतदार, नागपूरमधील मतदार यादीतील घोळ उघड 

नागपूर : खरा पंचनामा 

नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपरिषदेच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या या याद्यांमध्ये अनेक गंभीर चुका असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. प्रभाग पाचमधील रहिवासी विलास भागवत यांच्या मते, घर क्रमांक एकवर तब्बल १९० मतदारांची नोंदणी आहे, परंतु यापैकी अनेक नावे रामकोना, धापेवाडा आणि खापरखेडा यांसारख्या इतर ठिकाणांवरील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची नावेही योग्य प्रकारे जुळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय, खामल्यातून आलेल्या ११ मेघे कुटुंबांची नावे प्रभाग पाचमध्ये चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केल्याचेही भागवत यांनी म्हटले आहे. प्रभाग तीनमधील चंदन वर्मा यांनी त्यांच्या प्रभागात ३५०० पैकी १५०० मतदार बाहेरचे असल्याचे सांगितले, तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची नावे प्रभाग चारमध्ये गेली आहेत. या सर्व अनियमिततेविरोधात निषेध म्हणून मतदार यादी जाळण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.