Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जीएसटी नोंदणी मिळवून देण्यासाठी 25 हजारांची लाच घेतानाच सुप्रिटेंडंट, इन्स्पेक्टरला अटक

जीएसटी नोंदणी मिळवून देण्यासाठी 25 हजारांची लाच घेतानाच सुप्रिटेंडंट, इन्स्पेक्टरला अटक

मुंबई : खरा पंचनामा

केंद्रीय अन्वेषण विभागाने CGST (सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स), सांताक्रूझ विभाग, मुंबई येथील सुपरिंटेंडंट आणि इन्स्पेक्टरला 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.

सीबीआयने हा गुन्हा 7 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदवला होता. तक्रारीनुसार, संबंधित CGST अधिकाऱ्याने एका खासगी वस्त्र व्यवसाय करणाऱ्या फर्मला जीएसटी नोंदणी मिळवून देण्यासाठी आणि अनुकूल अहवाल तयार करून देण्यासाठी 25000 रुपयांची लाच मागितली होती. या फर्मने 24 सप्टेंबर 2025 रोजी ऑनलाईन जीएसटी नोंदणीसाठी अर्ज केला होता.

तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबर 2025 रोजी तपासणी दरम्यान, संबंधित इन्स्पेक्टरने स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी लाचेची मागणी केली, आणि धमकी दिली की जर पैसे दिले नाहीत तर GST नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही. सीबीआयने सापळा रचून 7 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील CGST पश्चिम कार्यालयात दोघा आरोपींना 25000 लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर, दोघा आरोपी अधिकाऱ्यांच्या ठिकाणी झडतीही घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.