Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार!

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार!

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातीलराजकीयपक्षाना आगामीस्थानिकस्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांचे वेधलागले असूनमोर्चेबांधणीसुरुझाली आहे. एकीकडे प्रशासना कडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर होत असून दुसरीकडे राजकीय पक्षांच्या बैठका आणि रणनीती सुरू आहे. तसेच, महाविकास आघाडी आणि महायुती होणार की नाही, यावरही मंथन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येतील यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना शरद पवारांकडून देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती बैठकीत देण्यात आली. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत निर्णय करा, अशा सूचनाही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे. काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे, आज अल्पसंख्याक समाजाचा निर्णय घेतला असेच युवक आणि युवतींचा निर्णय होणार आहे, असे पवारांनी सांगितले.

दरम्यान, आजच्या बैठकीत शरद पवारांना धर्मनिरपेक्षता जपण्याचं आवाहनही सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं आहे. सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्या संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा निषेधही शरद पवारांनी नोंदवला. पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. जातीय सलोखा ठेवा, स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा, आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना देखील शरद पवारांनी बैठकीत दिल्या आहेत. तसेच, राजकारणात जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. लोकांच्या धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा ते जास्त महत्वाचे आहे. वाचाळवीर वाढले आहेत, दुदैव आहे कोणी कोणाकडून काय खरेदी करावे यावर सरकार गप्प बसते? सरकारचा त्याला पाठिंबा आहे का? दरी निर्माण केली जातोय, असेही पवारांनी म्हटले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.