Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणुकीआधीच मतदार यादीत मोठा बदलआयोगाच्या निर्णयाने उमेदवारांमध्ये संभ्रम

निवडणुकीआधीच मतदार यादीत मोठा बदल
आयोगाच्या निर्णयाने उमेदवारांमध्ये संभ्रम

मुंबई : खरा पंचनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची लगबग वाढलेली दिसत आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

प्रभागनिहाय मतदार यादीवर उमेदवार व मतदारांची नजर खिळलेली असताना आयोगाच्या अचानक घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

या निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्येचा हिशोबच उमेदवाराचं भविष्य ठरवतो. त्यामुळे प्रारूप यादीवर आक्षेप, हरकती, सूचनांचा पाऊस पडत होता. राजकीय पक्ष, स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवारांची हालचाल वेगात सुरू होती. याच पार्श्वभूमीवर आयोगाने 'डेडलाइन' पुढे ढकलून मैदानात नवा ट्विस्ट आणला आहे.

आयोगाचा बदललेला कार्यक्रम :
प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ.
ही मुदत पूर्वी १३ ऑक्टोबर होती.
प्रारूप यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आता ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार (पूर्वी २८ ऑक्टोबर)

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका रंगतदार होण्याचे संकेत आधीच दिसत होते. आयोगाने दिलेल्या या मुदतवाढीमुळे इच्छुक उमेदवारांसाठी मैदान आणखी खुले झाले असून, राजकीय समीकरणातही काही 'धक्कादायक' घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.