Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यातसुद्धा ठेवणार नाही"

"अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यातसुद्धा ठेवणार नाही"

बीड : खरा पंचनामा

मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाचं फलीत म्हणून सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय काढला होता.

ओबीसी समाजातल्या काही घटकांकडून सुरुवातीला या गॅझेटला कडाडून विरोध झाला होता. मात्र गॅझेटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या नोंदी बघून विरोध मावळला अन् आरक्षणाची नवीन मागणी पुढे येऊ लागली. हैदराबाद गॅझेटमध्ये वंजारी समाजाचा उल्लेख एसटी प्रवर्गात असल्याचा दावा केला जात आहे.

हीच मागणी घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी येथे वंजारी समाजबांधवांनी उपोषण सुरु केलं होतं. प्रशासनाच्या मदतीने आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. उपोषणकर्त्यांशी धनंजय मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. कारण यापूर्वी जरांगे पाटलांनी वंजारी समाज बंजारा समाजाचं आरक्षण खातो, असा आरोप केला होता.

हैदराबादचं गॅझेट निघालं नसतं तर आपण एसटी आरक्षणात आहोत, हे कळलं नसतं. बऱ्याच राज्यांमध्ये आपण एसटी प्रवर्गात आहोत. हे आपल्याला अगोदरच माहिती होतं, कारण तेलंगणाच्या बॉर्डरजवळ परळी आहे. तेलंगणात असलेले आपले अनेक पाहुणे एसटीध्ये आहेत. पण महाराष्ट्रात आपण एनटीमध्ये आहोत, असं धनंजय मुंडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटनुसार इतर कुणाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हालाही या गॅझेटप्रमाणे एसटी आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. आपलं दोन टक्क्यात बरं चाललं होतं. दोन टक्केसुद्धा काढा म्हणून दोन टक्क्यात बरं चाललं होतं. दोन टक्केसुद्धा काढा म्हणून काहीजण बोलत आहेत. जे असं बोलत आहेत ना की, वंजाऱ्यांचं दोन टक्के आरक्षण काढा.. अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यातसुद्धा ठेवणार नाही, एवढं सांगतो.. असा इशारा मुंडेंनी दिला.

"माझी विनंती आहे की, सरकार आपल्यासोबत आहे. सरकारवर विश्वास ठेवा. पालकमंत्र्यांनी आणि सुजय विखेंनी तिथे येऊन मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे शासनाचा मान ठेऊन आपण उपोषण सोडावं, अशी मी कळकळीची विनंती करतो." असं शेवटी धनंजय मुंडे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.